१३ मोगल साम्राज्याशी संघर्ष

              १३ मोगल साम्राज्याशी संघर्ष

                    तत्कालीन मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मोगल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.


            औरंगजे़ब

           (इ.स. १६१८ - इ.स. १७०७) हे मोगल सम्राट होते. त्यांनी त्या वेळी आपल्या राज्यात शरियत (इस्लामी कायदा) लागू केला होता. गैर-मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारे ते पहिले मुसलमान राज्यकर्ता होते. तसेच त्यांनी जिझिया कर परत लागू केला.

                     त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत मराठा साम्राज्यावर आणि इतर विरोधकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्‍नांत घालवला. सम्राट औरंगजेब सत्ताधीश झाल्यानंतर उत्तर पूर्वेकडील सीमेच्या संरक्षणाकडे त्याने लक्ष दिले वारसा हक्काच्या युद्धामुळे निर्माण झालेला गोंधळाचा फायदा घेऊन आसाम व कुछ बिहारच्या अहोम शासकांनी स्वतंत्र होण्याचे ठरविले यावेळी कुचबिहारचा शासक प्रेमनारायण यांनी शेजारचा काही मुघल प्रदेश ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या सन १६५८मध्ये त्याच्या सैन्याने आसामची राजधानी गोहाटी ताब्यात घेऊन प्रचंड लूट केली.

            तेव्हा प्रेम नारायणाचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मीर जुमलाची बंगालची सुभेदारपदी नेमणूक केली परंतु विशेष काही साध्य न होताच १६६३मध्ये मीर जुमलाचा मृत्यू झाला रायबाघन एक थोर करारी औरंगजेब ची सेनापती म्हणून काम करत होती ती महाराष्ट्र मधील वर्हाड प्रांतातील होती.

Comments