९ कोल्हापूरची लढाई

                                  ९ कोल्हापूरची लढाई

                                                     

               रुस्तमजमान कडे अनेक मातब्बर सरदार होते फ़ाजलखान, मलिक इत्बार, सादतखान, याकुबखान, हासन खान, संताजी घाटगे इत्यादी व त्याचे सैन्यबळही मोठे होते. शिवाजी महाराजांच्या सेनेत नेतोजी पालकर , हणमंतराव खराटे, हिरोजी इंगले, भिमाजी वाघ इत्यादी सरदार होते.

                  शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत असे कळाल्यानंतर पन्हाळ्यावर आक्रमणकरण्याच्या बेतात रुस्तमजमान होता. परंतु २८ डिसेंबरला पहाटेच अचानकपणे शिवाजी महाराजांनी रुस्तमजमानच्या सेनेवर जोरदार हल्ला चढवला. पूर्ण जोरदार हल्ला न चढवता पुढून मागून आजूबाजूने तुकड्यांनी हल्ले चढवले व आदिलशाही सेनेला नामोहरम केले. रुस्तमजमान रणांगण सोडून पळून गेला.



Comments