५ जावळी प्रकरण

                                               ५ जावळी प्रकरण

                        आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.

                            छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेला जावळी विजय हा स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने पहिला देदीप्यमान पराक्रम मानला जातो. शिवचरित्रातील हा पहिला लष्करी पराक्रम आदिलशाही सुलतानाची झोप उडवणारा व अनेक मराठा सरदार देशमुखांना वास्तवाची जाणीव करून देणारा ठरला. जावळी विजया मुळेच स्वराज्य स्थापनेत लष्करी आर्थिक सामर्थ्य प्राप्त झाले. तसेच खऱ्याअर्थाने भोसल्यांच्या पुणे जहागिरीचा चे रूपांतर स्वराज्यात झाले. आदिलशाहीची सेवा करण्यात स्वतःला धन्यता मानून स्वराज्य निर्मितीच्या कार्यात खीळ घालणाऱ्या व पुंड शाही माजवणाऱ्या लोकांवर शिवाजी महाराजांचा वचक निर्माण झाला. व स्वराज्यनिर्मीतीच्या मार्ग सुलभ झाला म्हणून जावळे विजय हा स्वराज्य निर्मिती मधील पहिला महत्त्वाचा टप्पा मानला जातो.



Comments