१८ सर्वत्र विजयी घोडदौड

                                         १८ सर्वत्र विजयी घोडदौड

                          शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.


   


   
तानाजी मालुसरे 
                  (जन्म: १६२६, गोडवली, सातारा; मृत्यू : सिंहगड किल्ला, ४ फेब्रुवारी १६७०) हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजीचे बालपणीचे सवंगडी होते. 
                  तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.

Comments